अनुया अशोक चव्हाण ह्या शिक्षिकेला पाच वर्षानंतर मिळाला न्याय

Share Now

277 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) पाच वर्षे अन्याया विरोधात लढणाऱ्या सहायक शिक्षिका सौ. अनुया अशोक चव्हाण यांच्या लढ्याला यश प्राप्त झाले. एप्रिल २०१७ पासून आज पर्यंत सामान्य शिक्षिकेला लढावे लागले. मा. शाळा न्याय्य प्राधिकरण, पुणे यांनी दि. १२ एप्रिल २०२२ रोजी न्याय दिला परंतू १५ महिने सातत्याने पाठपुरावा करूनही न्यायालयान आदेश शाळे कडून, संस्थे कडून आणि जिल्हा शिक्षण प्राथमिक विभागाकडून पाळले जात नव्हते. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी केली जात नव्हती या दरम्यान अनेक स्थित्यंतरे घडली विविध प्रकारे पत्रव्यवहार झाला तरीही न्याय मिळत नाही हे पाहून प्रचंड मानसिक ताण येत होता एकीकडे मुलांचे उच्च शिक्षण कसे करावे एकीकडे हा नोकरीमध्ये न्याय मिळूनही प्रश्न अनुत्तरित राहतो आहे या सर्व परिस्थितीत फक्त आमरण उपोषण हा पर्याय समोर आला आणि खरोखर आज या आमरण उपोषणाला योग्य प्रतिसाद रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या योग्य भूमिके मुळे या प्रकरणातील मेरीट पाहून १५ महिन्यांपासून प्रलंबित न्याय प्रस्थापित झाला. पाच वर्ष हा लढा सुरू होता आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा लढला गेला. आणि यशस्वी देखील झाला. या संपूर्ण आंदोलना मध्ये अनुया चव्हाण यांच्या पाठीशी असणारे अशोक चव्हाण, ताई शकुंतला पाटील, रवी पाटील, कामगार नेते संतोष पवार, वैशाली लाड आणि विनोद लाड यांचे फार मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.अनुया चव्हाण यांना न्याय मिळाल्याने या प्रकरणात प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे त्यांनी जाहीर आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *