भर पावसातही उरणचा मधुबन कट्टा बहरला

Share Now

57 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण व मधुबन कट्टा उरण यांच्या संयुक्त विद्यमाने ९३ वे कवी संमेलन सोमवार दिनांक. १७ जुलै २०२३ रोजी मार्गदर्शक प्रा. रायगड भूषण एल. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विमला तलाव येथे भर पावसातही संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत मुकादम यांनी भूषविले. तदनंतर कोमसापचे ज्येष्ठ कवी व महाड शाखेचे शाखाध्यक्ष कै. सुरेश हरवंदे काका, बोकडवीरा गावचे ज्येष्ठ कवी कै. पांडुरंग भोईर, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रवींद्र महाजनी तसेच रामदास बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना कोमसाप उरण व मधुबन कट्ट्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवप्रसाद पंडितसर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कवी संमेलनाची सुरुवात रमण पंडित यांनी गणेश वंदना गाऊन केली. त्यानंतर कोमसाप महाडचे शाखाध्यक्ष कैलासवासी सुरेश हरवंदे काका यांच्या जीवनावर आलेल्या कवितांचे अभिवाचन मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. तर त्यांच्या जीवनावर आधारित कविता प्रा. एल बी पाटील यांनी सादर केली. कवी संमेलनामध्ये पाऊस गाणी व दीपपूजा या विषयांवर अनेक कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. त्यामध्ये बालकवी कु. अनुज शिवकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच राम म्हात्रे, भ. पो. म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, संजय होळकर, अजय शिवकर, शिवप्रसाद पंडित, हेमंत पाटील इ. नी बहारदार रचना सादर केल्या. त्यानंतर या मधुबन कट्ट्याच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश तांडेल यांना पत्रकारिते करिता तसेच प्राध्यापक डॉक्टर साहेबराव ओहोळ यांना शैक्षणिक क्षेत्रा करिता देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जयेश वत्सराज, सुरेश भोईर, रमाकांत पाटील,सुनील पाटील,पत्रकार विठ्ठल ममताबादे, रवींद्र म्हात्रे व गणेश कोळी इत्यादींची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर व आभार प्रदर्शन मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *