सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे च्या माध्यमातून गोर-गरीब गरजू अनाथ मुलांना वह्या-पुस्तके वाटप मोहिम

Share Now

172 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) सामाजिक कार्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन समीर म्हात्रे,कळंबुसरे यांनी २० एप्रील २०२३ रोजी स्थापन केलेल्या सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व मोफत शिकवणी वर्ग, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्य वाटप, सामाजिक संस्थांना पुरस्कार असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

गोर-गरीब गरजू अनाथ मुले ही शिक्षणापासून वंचित राहू नयेत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या संस्थेच्या माध्यमातून दि. २० जूलै, २०२३ पासून मोफत वह्या-पुस्तके वाटप मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आजतागायत ८ मुलांना मोफत वह्या – पुस्तके, गाईड्सचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ही मोहिम अखंडपणे चालू राहणार आहे अशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी ग्वाही दिली आहे. तसेच आपल्या कोणाच्याही संपर्कात अशी मुलं असतील आणि त्यांना मोफत वह्या – पुस्तकांची मदत हवी असल्यास किंवा कुणालाही अशा मुलांना आर्थिक किंवा वस्तूरूपात मदत करायची असल्यास संस्थेच्या पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

समीर म्हात्रे (संस्थापक अध्यक्ष)-९५९४०७६६५७,सचिन शाम पाटील (उपाध्यक्ष)-८४१९५४०८६०, संजय म्हात्रे (सचिव)-९५९४२६५१८८, पद्माकर पाटील (कार्याध्यक्ष)-७०४५२३१७३६, विठ्ठल ममताबादे (मिडिया सल्लागार)-९७०२७५१०९८,शैलेश भोजानी (खजिनदार)-९८२१२०६८२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *