नागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे सविस्तर वृत्त असे की अंबा नदीची पातळी दर वर्षी पावसामध्ये ओलांडल्यावर कोळीवाड्यात दर वर्षी पुराचे पाणी शिरते सन 23/ 07/1989 च्या महापुरा नंतर तो परिसर लाल रेषेत म्हणजेच सरकारी सर्व्हे नुसार पूररेषेत असल्याचे नोंद सरकारी दप्तरीत झालेली आहे. नागोठणे एसटी स्टँड बंगले आळी नागोठणे बाजार पेठ कोळीवाडा खान मोहल्ला त्या लाल रेषेत येत आहेत
महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालय नागोठणे यांनी विज पुरवठा कोळीवाडा खान मोहल्ला हुजरा मोहल्ला येथील वीज ग्राहकांना सुरळीत उपलब्ध व्हावे म्हणून पूर्वी पार पासून मशिदीच्या समोर उर्दू शाळेच्या अगदी शेजारी वीज विद्युत पुरवठा पुरवणारे ट्रान्स मीटर तसेच फ्युज डीपी बसविले आहे परंतु ते फ्युज डीपी रस्त्या पासुन एक ते दीड फुटांच्या कमी अंतरावर बसवल्याने दर वर्षी पुराचे पाणी त्या डीपीमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काँग्रेस आय पक्षाचे नागोठणे शहराध्यक्ष सौ शब्बाना आसिफ मुल्ला यांनी सांगितले त्यापुढे म्हणाल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे असे महाराष्ट्र विज महावितरण कार्यालय नागोठणे यांना समजताच त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊ नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या अनुषंगाने वीज महावितरण कार्यालय नागोठणे विज ग्राहकांची दक्षता घेत त्यावेळी वीज खंडित करते जो पर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही तो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत ग्राहकांना केला जात नाही कधी कधी रात्र दिवस दोन दिवस विद्युत पुरवठा ग्राहकांना दिला जात नाही त्यामुळे नाईलाजास्तव अंधेरात लहान मुलांना तसेच वयोवृद्ध माणसांना राहावे लागते जेथे ट्रान्स मीटर बसविण्यात आलेले आहे त्या ट्रान्समीटरच्या तारांवर झाडाझुडपांचे बेल चढली आहे जंगलासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या जागी केरकचरा प्रचंड प्रमाणात साचलेला आहे अस्वच्छतेचा प्रमाण वाढला आहे.
फ्युज डीपीचे दोन्ही दरवाजे उघड्या अवस्थेत असतात जवळच असलेले कोळीबांधवाचे घरे त्या घरातील लहान मुले तसेच उर्दू शाळेमध्ये पहिली दुसरी इयत्ता शिकतअसलेले लहान मुले त्या परिसरात रस्ता क्रम करत असतात एखादा लहान मुलगा त्या जिवंत वीज असलेले फ्युज डीपी जवळ गेले असता व त्या उघड्या डीपीला हाताने स्पर्श केल्यास जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व परिस्थितीचा निपटारा महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कार्यालय नागोठणे चे सहाय्यक अभियंता नितीन जोशी साहेब यांनी त्या ठिकाणी जावून तेथील फ्यूज डीपी जागेची पाहणी करून परिस्थिती पाहून लक्ष केंद्रित करून रस्त्यापासून कमी अंतरावर बसविण्यात आलेले फ्युज डीपी त्या जागेतुन हलवून फ्युज डीपी ही रस्त्यापासून सात ते आठ फूट उंचीवर बसविण्यात यावे.
सिमेंट व विटाचे बांधकाम करून त्या फ्युज डीपीला त्या बांधकामावर कायमस्वरूपी उंच ठिकाणी बसविण्यात यावे तसेच आजूबाजूचे लोखंडी संरक्षण दरवाजे नीटनेटके सुधारित अवस्थेत कड्या कोंड्या सहित लावून वीज कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणाची देखरेख काळजीपूर्वक करण्याचे आदेश देण्यात यावे दरवाजे उघडल्यानंतर पुन्हा बंद करण्याचे तातडीचे आदेश जारी करावे त्या फ्युज डीपीत पुराचे पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच विज ग्राहकांची कायमची होत असलेली गैरसोय कायमस्वरूपी दूर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लवकरात लवकर सहायक अभियंता साहेब यांनी करावे.
पुराच्या पाण्यामध्ये साप विंचू तसेच विषारी जनावरांची जास्त वर्दळ होत असते त्यामुळे अंधेराचा फायदा घेत लोकांच्या घरांमध्ये जनावर बसण्याची दाट शक्यता असते लोकांच्या जीवाला धोका होऊ शकते तशी परिस्थिती उद्भवू नये त्याची दक्षता विज महावितरण नागोठणे कार्यालयातील सहाय्यक अभियंता नितीन जोशी साहेब यांनी अशा गंभीर परस्थीतीची खबरदारी घ्यावी. तसेच रात्र दिवसभर वीज खंडित होऊन तेथील नागरिकांना दरवर्षी पावसात होणारे मानसिक ताण व त्रासाला दूर करण्याचा प्रयत्न करावे असे काँग्रेस आय पक्षाचे नागोठणे शहर महिला अध्यक्षा सौ. शबाना असिफ मुल्ला यांनी येथील स्थानिक रहिवाशांच्या वतीने जोरदार मागणी केली आहे