नागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे कोळीवाड्यातील उर्दू शाळेच्या शेजारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नागोठणे शाखेतर्फे पूर्वी पार पासून बसविण्यात आले आहे. ट्रान्समीटर तसेच फ्युज डीपी हे दरवर्षी पुराच्या पाण्याच्या खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची खबरदारी काँग्रेस आय पक्षाचे नागोठणे शहराध्यक्षा सौ. शब्बाना असिफ मुल्ला यांनी दोन दिवसा पुर्वी घेवून रायगड सलाम या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. त्या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नागोठणे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता नितीन जोशी साहेब यांनी प्रसिद्धी बातमी पत्राची तातडीने दखल घेत नागोठणे शहराध्यक्षा सौ. शब्बाना असिफ मुल्ला यांनी स्थानिक रहिवाशांच्या वतीने दरवर्षी पुरामुळे होत असलेल्या विद्युत खंडित समस्यांना लक्षात घेत जी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण नागोठणे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांच्याकडे केलेल्या मागणी अखेर आले यश सलाम रायगड बातमीपत्रात प्रसिद्धी झालेल्या मागणीला महाराष्ट्र राज्य महावितरण नागोठणे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांनी आपल्या जवळ असणारे सर्व विद्युत कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन दुसऱ्या दिवशी भर पावसात फ्युज डीपी उंच जागी स्थलांतरित केली सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांनी तातडीने रात्र दिवसभर पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याचे पाहता विद्युत पुरवठा खंडित होत असे त्या लोकांच्या समस्या कायमचे दूर केल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नागोठणे कार्यालयचे सहाय्यक अभियंता नितीन जोशी व नागोठणे गावातील सर्व वीज कर्मचाऱ्यांचे तसेच सलाम रायगड प्रसिद्ध वृत्त बातमी पत्राचे व प्रतिनिधी पत्रकार याकुब सय्यद या सर्वांचे शहराध्यक्षा सौ. शब्बाना असिफ मुल्ला तसेच प्रिय दर्शनी चालक मालक सहकारी संस्था अध्यक्ष शिराज भाई पानसारे सामाजिक कार्यकर्ते आसिफ भाई मुल्ला सामाजिक कार्यकर्ते तसवूर अधिकारी मुजफ्फर कडवेकर सोहेल पानसारे शब्बीर भिकन यांनी नागोठणे येथील विज कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
सलाम रायगड बातमीच्या दणक्याने नागोठणे विद्युत फ्युज डीपी उंच जागी स्थलांतरित करण्यात आली शहराध्यक्ष सौ. शबाना मुल्ला यांच्या मागणीला आले यश
166 Views