सामाजिक कार्यकर्ते संकल्प घरत यांचा वाढ दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Share Now

111 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे) उरण-उलवे विभागातील सामाजिक कार्यकर्ते संकल्प घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. सेक्टर 19 मध्ये वृक्षारोपण, अनाथ आश्रमात साहित्य वाटप, ईशाळ वाडीतील सर्व आदीवासी बंधूसाठी भेटवस्तू वाटप, साई नगर आदिवासी वाडीतील बांधवांना ब्लॅकेट वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संकल्प घरत, श्री साई देवस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, राधाकृष्ण पाठक, वैभव चौधरी, हितेश शिंगरे, अरुण सावंत, नरेंद्र देशमुख,विजय पाटील, सुनिल पांडे, हरेिश रावल, संदिप सावंत,राजू पाटील, महादेव घरत, पुष्कर तेरडे,संग्राम जी, गोविंद धास, रामा यादव, गणपत हेगडकर, अमोल शिंदे, मुकेश अग्रहरी, अजय हेगडकर, श्रीरंज खुद्रपल्ली, अवदेश महतो, प्रशांत कोरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संकल्प घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही जणांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *