स्टेल्लर कंपनीच्या फायबर टॉयलेट कंटेनरला लागलेली आग चंदू पाटील यांनी विझविली, कर्मचाऱ्यांनी केला भोम गावच्या चंदू पाटील यांचा सत्कार

Share Now

156 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) रविवारी दिनांक 2/7/2023 रोजी उरण तालुक्यातील टाकीगाव येथे असलेल्या स्टेल्लर कंपनी मध्ये फायबर टॉयलेट कंटेनर ला (Exhaust Fan) च्या शॉर्ट सर्किट मुले आग लागली. हि आग त्याच कंपनी मधील कंत्राटी कामगार, भोम गावचे सुपुत्र चंदू पाटील हे टाकिगावात जात असताना त्यांना दिसली. त्यांनी लगेच धावत पळत जाऊन मेन गेट वर असणाऱ्या सिक्युरिटी ला सांगून ती आग विझवण्यात त्यांना यश आले. चंदू पाटील यांनी प्रसंगावधान राखून लागलेली आग विझविली व होणारी खूप मोठी दुर्घटना टाळली. लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष झाले असते तर कंपनी मधील शेकडो कामगारांच्या जीवाला धोका होता शिवाय करोडो रुपयाची मालमत्ता, साहित्य कंपनीत होते त्यामुळे त्याचेही प्रचंड नुकसान झाले असते मात्र ही सर्व दुर्घटना चंदू पाटील या माणसामुळे टळली. चंदू पाटील यांच्या या धाडसी कार्याचे कौतुक करत स्टेल्लर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्याचा सत्कार केला. मंगेश ठाकूर, सज्जन जोशी, गणेश कोळी, रोहित नाईक, परशुराम जोशी, संदीप वर्तक आदी कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *