जासई विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दलबद्दल सत्कार

Share Now

162 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, या विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. शितल वाघमारे ही एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग सर तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख गुरुकुल प्रमुख ठाकरे एस. पी, प्रा. अतुल पाटील या सर्वांनी विद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन करून सुयश चिंतले.

कुमारी शितल वाघमारे ही अतिशय गरीब हलाखीच्या परिस्थितीतून कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता मेहनत व जिद्दीने तिने हे यश मिळविले आहे तिने विद्यालयाचे नाव लौकिक केले आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *