नागोठणे (याकुब सय्यद) सविस्तर वृत्त असे की नागोठणे गावांमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अंबा नदीच्या पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने चार दिवसापूर्वी ओलांडली होती. त्यामुळे नागोठणे एसटी स्टँड बंगले आळी कोळीवाडा तसेच मस्जिद नागोठणे या ठिकाणी चार ते पाच फूट पुराचे पाणी शिरले होते. त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून येणारा केरकचरा पवित्र मस्जिद नागोठणे प्रवेश दरवाजासमोर तुंबून राहिला आहे. त्या परिस्थितीकडे नागोठणे ग्रामपंचायत लक्ष केंद्रित का करत नाही. असे सवाल मस्जिद मध्ये नमाज पठण करणाऱ्या लोकांकडून केले जात आहे. त्या वार्डातील लोकप्रतिनिधी हे देखील अस्वच्छतेकडे कानाडोळा करत असल्याने पोराच्या पाण्यामुळे साचलेले केरकचरा जसेच्या तसेच त्या ठिकाणी पडलेले आहे. त्यामुळे मस्जिदीच्या समोर असलेली दुर्गंधी ही अशोभनीय व चिंतनी आहे. पवित्र मस्जिदिच्या समोरील केरकचरा लवकरात लवकर स्वच्छ करावे अशी तेथील तमाम मुस्लिम बांधवांची नागोठणे ग्रामपंचायतिकडे जोरदार मागणी होत आहे.
नागोठणे पवित्र मशिदीच्या समोर अस्वच्छतेचा साम्राज्य ग्रामपंचायतीचा अस्वच्छतेकडे दुर्लक्ष
146 Views