रायगड भूषण राजू मुंबईकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Share Now

267 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्हयात विशेषतः पनवेल, पेण उरण तालुक्यात आदिवासींचा मित्र म्हणून सुपरिचित असलेले व ज्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासी बांधवांसाठी समर्पण केले असे निसर्ग प्रेमी, प्राणीमित्र तथा केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांचा वाढदिवस 24 जुलै 2023 रोजी होता. मात्र 23 जुलै ते 26 जुलै या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवून राजू मुंबईकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल, डाबर इंडिया लिमिटेड, श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जुलै 26 जुलै या चार दिवसा दरम्यान 30 हून अधिक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पीपी इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वी येथे पर्यावरण व स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर चित्रकला स्पर्धा, चिरनेर आश्रम शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध ठिकाणी आरोग्य शिबीर, आदिवासी बांधवांना अन्न धान्याचे वाटप, वृक्षारोपण, करुणेश्वर वृद्धाश्रमात आजी आजोबांना ब्लॅंकेट व ज्यूस वाटप, एलईडी टीव्ही भेट असे 30 हून अधिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर व या संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रितम म्हात्रे व ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य, डाबर इंडिया लिमिडेचे पदाधिकारी, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेचे अध्यक्ष संगीताताई ढेरे, सामाजिक कार्यकर्ते भारतशेठ भोपी, विनोद पाटील, सुरेंद्र पाटील, अजिंक्य पाटील, संदेश घरत, अनिल घरत यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राजू मुंबईकर यांना प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी व्हॉटसअप, फेसबूकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू मुंबईकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *