कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली 40 युवकांना नोकरी पत्राचे वाटप, वर्षाला किमान 300 युवांना रोजगार देणार

Share Now

219 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) युवकांना रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात रोजगार देण्याचा चंग कामगार नेते महेंद्रजी घरत यांनी आपल्या सोबत अहोरात्र काम करणाऱ्या कष्टाळू सहकाऱ्यांसह बांधलेला आहे. त्यानिमित्ताने जसखार, धुतूम उरण येथे तीन-तीन महिन्याच्या अंतराने रोजगार मेळाव्याचे आयोजन करून युवक युवतींची शैक्षणिक अहर्ता करून नव्या ॲपची निर्मिती करत माहिती संकलन करून विविध कंपन्या सोबत शेअर करत युवक युवतीना रोजगारासाठी मुलाखतीसाठी प्राधान्य मिळवून दिले व याचीच परिणीती म्हणजे रोजगार मेळावा निमित्त आलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणावर नेमण्याची संधी उपलब्ध झाली.

त्यामधील 40 उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी युवांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे सहकारी लंकेश ठाकूर, हेमंत ठाकूर, वैभव ठाकूर, अंगद ठाकूर, किरण कुंभार आणि चंद्रकांत नथुराम ठाकूर यांचा सत्कार महेंद्रजी घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना महेंद्रजी घरत म्हणाले बेरोजगारांना रोजगार देणे हे माझे पुण्य कर्म आहे एक घरांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून देण्याचं काम हे आपल्या युनियनच्या प्राधान्य क्रम आहे आणि आपण सर्व हे काम चांगले करत आहात याबद्दल मला आपला अभिमान आहे. यावेळी एन.एम.जी. के.एस संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *