वाराणसीतिल मंदिर संमेलनातिल ढोल पथकात रोह्याच्या आशुतोष पाटीलचा सहभाग

Share Now

220 Views

रोहा- (दीप वायडेकर) जगभरातील मंदिरांचे आंतरराष्ट्रीय मंदिर महा अधिवेशन वाराणसी येथे नुकतेच संपन्न झाले. या मंदिर संमेलनात देशभरातून एकमेव युवानाद या पनवेल येथिल ढोल पथकाला सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. रोह्याच्या कु. आशुतोष महेंद्र पाटील हा युवक वाराणसीत गेलेल्या ढोल पथकात सहभागी झाला होता.

टेम्पल कनेक्ट या संस्थेने या मंदिर आधिवेशनाचे २२ ते २४ जुलै दरम्यान वाराणसी येथे आयोजन केले होते. जगभरातिल ४३५ मंदिरांचे ७६७ प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यामध्ये रोहयाच्या श्री. धविर महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मकरंद बारटक्के आणि अमोल देशमुख यांनाही निमंत्रित म्हणून सहभागी होण्याचे बहुमान मिळाले होते. पनवेल येथिल युवानाद या देशभरातुन एकमेव ढोल ताशा पथकाला या संमेलनात सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पनवेल येथिल प्रथमेश सोमण यांच्या ५० मुलांच्या या ढोल ताशा पथकामध्ये रोह्याच्या कु. आशुतोष महेंद्र पाटीलचाही समावेश होता. दोन दिवस या पथकाने आपल्या पारंपारिक कलेचे सादरीकरण वाराणसी मध्ये केले. रोहयातिल निष्णात वकील ऍड. महेंद्र पाटील आणि ऍड. मीरा पाटील यांचा कु. आशुतोष हा चिरंजीव आहे. रोहयातुन मकरंद बारटक्के, अमोल देशमुख यां मान्यवरांसह कु. आशुतोष पाटीलला ही या अंतरराष्ट्रीय मंदिर महाअधिवेशमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्याचे व त्याच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *