रोहा- (महेंद्र मोरे) चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी व दापोलीच्या २४ वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. या घटनेने दापोली यांसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. घ्टनेनेचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातही उमटू लागलेत. रोहा तालुक्यातील नाभिक समाज सोमवारी प्रचंड आक्रमक झाला. रोहा तालुका तरुण संघांच्या वतीने राम मारुती चौक येथे भगिनी निलिमा चव्हाण हिला श्रद्धांजली अर्पण करून रोहा नगरपालिका येथून तहसीलदार कार्यालयात पर्यंत असंख्य समाज बांधवांनी मूक मोर्चा काढुन घटनेचा निषेध व्यक्त केला. निलिमा चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे, ज्या आरोपी ने निलिमा हिला मारले त्याचा तात्काळ शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समाज बांधवांनी केली. नाभिक समाजाकडून रोहा तहसीलदार किशोर देशमुख व रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या महाराष्ट्रात कुठे ना कुठे माता भगिनीवर अत्याचार, खून अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार घडु नये यासाठी या विधीमंडळात संबधीत आरोपीविरोधात कठोर कायदे करावे व त्यांची अमंलबजावणी करावी. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व रायगडचे खा सुनील तटकरे यांनी आमच्या नाभिक समाजातील निलिमा चव्हाण या भगिनींला न्याय मिळवून द्यावा, आरोपीस पकडून त्याच्यावर कठोरपणे कारवाई करावी, जो पर्यत न्याय मिळत नाही तोपर्यंतच आमचे आंदोलन सुरुच राहिल असे रोहा तालुका नाभिक समाज अध्यक्ष प्रविण पवार, मयुर दिवेकर, यशवंत खराडे, मंगेश रावकर, निलिमा खराडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
या वेळी रोहा तालुका नाभिक तरुण तालुका अध्यक्ष प्रविण पवार, उपाध्यक्ष दिलीप मोहिते, यंशवत खराडे, सोपान मोहिते, बबन मोहिते, राजेश खराडे, मयुर दिवेकर, रोहा शहर नाभिक अध्यक्ष मंगेश रावकर, किशोर खंडागळे, केतन पवार, सदानंद साळुंखे, उत्तम साळुंखे, मगेश सकपाळ, मंगेश सकपाळ, शेखर सकपाळ, विनायक रावकर, राजेश खराडे, बळीराम काशिद, सचिन रावकर, प्रभाकर मोहिते, दिलीप शिंदे, निलिमा खराडे, सुवर्णा बुरुणकर, मानसी दिवेकर, सुरेखा पवार, रश्मी खराडे यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थितीत होते.