रोहा ( उद्धव आव्हाड ) रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १७४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८७ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. नेत्र रुग्णांना नवी दृष्टी प्रदान करणाऱ्या या शिबिराने एकाच दिवशी ८७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा नवा उच्चांक नोंदविला आहे.
रोहा सिटिझन फोरमने गेल्या वर्षभरात ७०० नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. फोरम आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदीर सभागृहात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ क्षमा, स्नेहा कविणकर, निकिता महाडिक, प्रतिमा गावित, सलोनी सुभेकर, ज्ञानेश्वर कांबळे आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, मिलिंद अष्टिवकर, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, दिनेश जाधव, प्रशांत देशमुख, परशूराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, शैलेश रावकर, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर आदी फोरम च्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.