रोहा (प्रतिनिधी) गुरुवारी ४ जानेवारीला रोहा भाजपा युनिकेम कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यावर ठाम आहे. भाजपाने गेट बंद आंदोलन करू नयेत, आंदोलन चुकीचे आहे, वादावर तोडगा काढून आंदोलन मागे घ्यावा, अशी चोहोबाजूनी चर्चा झाली. दुसरीकडे आम्ही भाजपाचे स्वार्थी आंदोलन धुडकावून लावू, खा सुनिल तटकरेंविरोधात आरोप खपवून घेणार नाही असा ईशारा अजित गट राष्ट्रवादीच्या काही युवा कार्यकर्त्यांनी दिला. सर्वच पार्श्वभूमीवर युनिकेम विरोधी गेट बंद आंदोलनावर रोहा भाजपा ठाम आहे. तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते युनिकेम कंपनीवर धडकणार, आ प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आ रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक आंदोलन होणार आहे, त्या राजकीय दबावाला बळी पडलेल्या युनिकेमच्या व्यवस्थापनाला भानावर आणणार, असा खणखणीत ईशारा भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी पुन्हा सोमवारी दिला. त्यामुळे रोहा भाजपाचे आंदोलन नेमके कसे होते, अजित पवार गट राष्ट्रवादी विरोधी भाजपात संघर्ष होतो का, सुरेक्षेच्या प्रश्नाचे काय ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युनिकेम विरोधात आम्ही गेट बंद आंदोलन करणार, पण हे आंदोलन खा सुनिल तटकरे व त्यांच्या काही ठेकेदारी यांच्या दबावाला बळी पडत असलेल्या व्यवस्थापनाविरोधात आहे, कामगारांविरोधात आंदोलन नाही, उगीच कामगारांना कोणी भडकवू नयेत, कामगारांनी समजून घ्यावे. कंपनीला वेठीस कोण धरतो, कोणी कंपनीला मागास ठेवली, प्रतिष्ठा धुळीस मिळविली, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे आमचे आंदोलन शांततेत होणार आहे, असा दावा अमित घाग यांनी केल्याने गुरुवारी काय काय घडामोडी घडतात ? याबाबत सर्वत्र तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
युनिकेम कंपनीच्या आंदोलन वादात भाजपा विरूध्द अजित पवार राष्ट्रवादी गटात गरमागरम जुंपली. मूळात दोन्ही पक्षाच्या तरुण ठेकेदारी गटात हमरातुमरी ठसन झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी गेट बंद आंदोलनाची घोषणा करताच वातावरण तंग झाले. यापुढे खासदारांची दादागिरी खपवून घेणार नाही, हा ईशारा राष्ट्रवादीच्या काही तरुण कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला. भाजपाने गेट बंद करून दाखवावे, आम्ही आंदोलन उधळून लावू, घाग यांची खा सुनिल तटकरेंवरील टीका हास्यास्पद आहे असा दांडपट्टा राष्ट्रवादीच्या युवकांनी चालविला. भाजपा विरुध्द राष्ट्रवादीतील संघर्ष पाहता गेट बंद आंदोलन होणार का ? यावर भाजपचे अध्यक्ष अमित घाग यांनी गेट बंद आंदोलन ताकदीने होणार असा पुनश्च ईशारा सोमवारी दिला. कामगारांच्या पोटावर मारण्याचे काम कोणी केले, कोणी कंपन्यांची वाट लावली, हे जगजाहीर आहे. त्यांच्या दबावाला युनिकेम व्यवस्थापन बळी पडत आहे. याच दादागिरी विरोधात गेट बंद आंदोलन होणार, पण हे आंदोलन कामगारांविरोधात कसे असेल, उगीच कामगारांना भडकवू नका, दोन महिने कंपनी डबघाईला होती. तेव्हा हे महान नेते होते कुठे ? अशी माहिती वजा टीका करत घाग यांनी जोरदार पलटवार केला. गेट बंद आंदोलनावर ठाम असल्याचे घाग यांज पुन्हा ठणकावून सांगितले. कंपनीच्या वाढीला, प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे सांगत आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी होतील, आंदोलनाची दखल कंपनीला घ्यावीच लागेल, असेच आंदोलन होईल असा निर्धार घाग यांनी व्यक्त केला. दुसरीकडे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आ प्रशांत ठाकूर यांना २८ डिसेंबर रोजी कामगार युनियनने पत्र पाठविले. कंपनीच्या गेटवर आंदोलन होणे कंपनी व कामगारांच्या हिताचे नाही, कंपनीच्या उत्पादनावर व नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे चर्चेतून मार्ग काढावा, आंदोलन स्थगित करावा, असे आ ठाकूर यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आ प्रशांत ठाकूर कामगारांच्या पत्रावर काय निर्णय घेतात, कंपनी व्यवस्थापन चर्चेसाठी तयार होते का, नेमका काय तोडगा निघतो ? याचीही चर्चा सुरू झाली. दरम्यान, आ प्रशांत ठाकूर यांच्या ७ डिसेंबरच्या पत्राला सहा उपाध्यक्षा वंदना पांडे यांनी अद्याप उत्तर दिले नाही, त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनावर नेमके कोणाचे दबाव आहे, हे लवकर समोर येणार आहे, तर भाजपा गेट बंद आंदोलनावर ठाम असल्याने नेमके काय होते ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.