त्या वादावर निघणार तोडगा ? युनिकेमविरोधी भाजपाचे आंदोलन तूर्तास स्थगित, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाच्या सामन्याला अखेर पूर्णविराम, कामगारांनी निःश्वास सोडला

Share Now

591 Views

रोहा (प्रतिनिधी) युनिकेम कंपनी विरोधात गुरुवारी गेट बंद आंदोलनाचा रोहा भाजपाने दिलेला ईशारा अपेक्षेप्रमाणे सध्यास्थितीत हवेत विरला. कंपनी व्यवस्थापनाला पूर्वसंध्येच्या रात्रौ उशिरा शहाणपणा सुचले. वादावर तोडगा काढण्यात महिन्याचा अवधी द्या, वादावर तोडगा काढू, गेट बंद आंदोलन मागे घ्या असे पत्रच युनिकेमच्या व्यवस्थापनाने रोहा भाजपला दिले. त्यानंतर गुरुवारी सकाळी गेट बंद आंदोलन तुर्तास स्थगित केल्याची घोषणा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी सरचिटणीस कृष्णा बामणे, एकनाथ ठाकूर, अनंता लाड, उपाध्यक्ष रवींद्र तारू, रोशन चाफेकर, कामगार आघाडी प्रमुख विलास डाके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी एमआयडीसीत अशांतता होईल असे कोणी काही करणार नाही, भाजपाच्या क्रियेला प्रतिक्रिया देणार नाही, अशी आश्वासक भावना व्यक्त केली होती. त्यावर गेट बंद आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत, दडपशाहीला बळी पडणाऱ्या युनिकेमच्या व्यवस्थापनाला धडा शिकविणार असा पूर्णविचार भाजपाचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी केला होता. त्यामुळे काय होणार ? याच चर्चेत रात्रौ सूत्र फिरल्याने भाजपाचे आंदोलन स्थगित झाल्याचे अधोरेखीत झाले तर कंपनीत ठेकेदारी मांगो आंदोलनाला भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी वादाचे स्वरूप आले होते, त्या वादादीत सामान्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याने मुख्यत: कामगारांनी नि:श्वास सोडल्याचे बोलले जात आहे.

तब्बल आठवडाभर रोहा यांसह जिल्ह्यात गाजत असलेल्या युनिकेम विरुद्ध गेट बंद आंदोलनावर सध्यातरी पडदा पडला आहे. युनिकेमचे व्यवस्थापन खासदारांच्या दबावाखाली काम करत आहे. त्यातून कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. कामगारांवर अन्याय होत आहे. सबंधीत एजन्सीला काम देण्याची दिलेली वर्कऑर्डर कामाची व्यवस्थापनाने पूर्तता केली नाही. व्यवस्थापनाने खासदारांचे ऐकले असा त्रागा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी करत थेट खासदारांवर दमदार हल्ला केला. त्या हल्ल्याला राष्ट्रवादीच्या काहींनी प्रतित्त्यूर दिले. अशा दोन्ही पक्षाच्या काहींचे केवळ ठेक्यासाठी भांडत आहे अशी तुफान चर्चा सोशल मीडिया व कामगारांत झाली. यात कामगार, सामन्यांचे हित काय ? असा सवालही उपस्थित झाला. याच घडामोडीत भाजपाचे गेट बंद आंदोलन उधळून लावू असा प्रतिईशारा राष्ट्रवादीने दिला आणि वातावरण तंग झाले. तरी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष कोणीच बोलत नाही, असे असतानाच बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी गेट बंद आंदोलन होणार नाही, कामगारांना अडविले जाणार नाही, असे भाकीत केल्याने काहीतरी सकारात्मक घडते याची प्रचिती आली. रात्रौ युनिकेमच्या व्यवस्थापनाने अमित घाग यांना पत्र पाठवून महिनाभरात वादावर तोडगा काढू, आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती वजा केली, अशी पत्रकार परिषदेत माहिती देत घाग यांनी गेट बंद आंदोलन तूर्तास मागे घेतल्याचे घोषीत केले. भाजपाचे गेट बंद आंदोलन स्थगित झाल्याने कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आ प्रशांत ठाकूर यांच्या ७ डिसेंबरच्या पत्राला कंपनी व्यवस्थापनाने उत्तर दिले नाही. त्याचवेळी उत्तर देत चर्चेचा मार्ग स्विकारला असता तर ही वेळ आली नसती, कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली नसती, कामगारांत अस्वस्थता पसरली. मात्र गेट बंद आंदोलनाच्या आदल्या रात्रौ वादावर तोडगा काढल्याचे पत्र देऊन व्यवस्थापनाने उशिरा शहाणपणा दाखवून दिले, हेच अगदी ठळकपणे समोर आले तर गेट बंद आंदोलनाऐवजी धडक मोर्चा पर्याय का नाही, गेट बंद आंदोलन योग्य होते का, भाजपा व राष्ट्रवादीत ठेकेदारीवरून फिक्सिंग फिक्सिंग नाही ना ? असा पत्रकारांनी केलेला सवाल सर्वांनाच निरुत्तर करणारा ठरला. यातच भाजपाचे नवे तालुकाध्यक्ष अमित घाग हे राष्ट्रवादीच्या लोकमान्य सर्वेसर्वा नेत्यांना भारी पडले की युतीचा धर्म म्हणत घाग यांना थोडी माघार घ्यावी लागली ? हे काही दिवसात समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *