रोह (महेंद्र मोरे) रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी रोहा रेल्वे स्थानकातील बंद तिकीट खिडकी व अन्य समस्यांवर सलाम रायगड ने वाचा फोडली. याची दखल रोहा रेल्वे स्थानक सल्लागार समिती वर सदस्य म्हणून नेमणूक झालेले वसंत शेलार,यज्ञेश भांड,नितीन तेंडुलकर यांसह भाजपा शहर उपाध्यक्ष शैलेश रावकर राकेश गुंदेशा यांनी तातडीने घेतली आहे.मंगळवार ९ जानेवारी रोजी सर्व सदस्य ॲक्शन मोड मध्ये येत रोहा स्थानक प्रबंधक आर के मीना यांची भेट घेत स्थानकावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन दिले.यावेळी माझ्या अधिकारातील समस्या तातडीने सोडवत अन्य समस्या वरिष्ठ पातळीवर कळवून त्याही सोडवण्यात येतील असे आश्वासन स्थानक प्रबंधक यांनी यावेळी दिले आहे.
रोहा रेल्वे स्थानक सल्लागार सदस्य यांनी दिलेल्या निवेदनात दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी रोहा दिवा गाडी पुर्ववत ४ वाजता सोडण्यात यावी.अपंग, जेष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने सोयीस्कर स्वयंचलित जिने सर्वच फलाटांवर बसवावेत.सर्व मेमु गाड्या ह्या फलाट एक वरुनच सोडाव्यात. मेमु गाड्यांच्या मध्ये स्वच्छता गृहांची व्यवस्था करावी.गाडी सुटण्याच्या दोन तास आधी तिकीट खिडकी उघडावी अश्या प्रवाश्यांच्या समस्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.यावेळी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी सदस्यांनी दिल्या. आपल्या निवेदनाची दखल न घेतल्यास मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील मुख्य कार्यालयात होणाऱ्या बैठकीत याचा जाब विचारण्यात येणार असल्याची सक्त ताकीद यावेळी सर्व सदस्यांनी स्थानक प्रबंधक यांना दिली आहे. सल्लागार म्हणून नियुक्ती होताच सर्व सदस्य ॲक्शन मोड मध्ये आले असल्याचे दिसत आहे. नक्कीच यामुळे रोहा स्थानकावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लागतील असा आशावाद प्रवासी वर्गात आहे.