रोहा ( विश्वजीत लुमन ) डी.इ.एस.अआंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सांगली येथील, श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेच्या भव्य मैदानावर दि.१२ व १३ जाने.२०२४ रोजी संपन्न झाली. यामध्ये आरसीएफ शाळा चॅम्पियन ठरली आहे. आरसीएफ शाळेतील १२,१४ व १७ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण ३९ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये १२ वर्षांखालील मुले,यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली तर ह्याच गटातील कुमार ध्रुव गणेश जामकर इयत्ता ७ वी ह्याला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.तर या शाळेतील विविध गटातून १२ वर्षा खलील मुले यामध्ये ध्रुव गणेश जामकर ८० मी. धावणे प्रथम व लांब उडी द्वितीय,आराध्य संजय म्हात्रे ७ वी,८० मी . धावणे तृतीय,१२ वर्षा खलील मुली राणी लक्ष्मण ठाकूर ६ वी ६००मी. धावणे प्रथम,१४ वर्षांखालील मुले विशाल कौशलेंद्रकुमार सिंग ९ वी ८० मी. हरडल्स प्रथम व उंचउडी द्वितीय,जीत किशोर पाटील ८ वी १०० व २०० मी.धावणे प्रथम,१४ वर्षा खलील मुली ४x१०० मी. रिले,तृतीय श्रावणी रत्नाकर पाटील ८ वी,पर्णवी अमोल मयेकर ७ वी,चिन्मयी गणेश ओव्हल ८ वी,व शुभ्रा प्रसन्ना कटोर ८ वी,रिया विरेश पाटील ८वी तर १७ वर्षा खलील मुले आर्यन रक्षण राऊत १० वी १००मी. धावणे प्रथम व २००मी. धावणे तृतीय,संगम कैलास कटारे ९ वी लांब उडी द्वितीय,४x१०० मी. रिले इ.१० वी प्रथम आर्यन रक्षण राऊत१० वी,विकास रामध्रुव चव्हाण १० वी,चिन्मय राकेश रोकडे १० वी,संगम कैलास कटारे ९ वी,१७ वर्षा खालील मुली आर्या सुशील केंदकी ९ वी २०० मी. धावणे तृतीय आदी विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करून आरसीएफ शाळेसह रायगड जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, आरसीएफ शाळा ठरली चॅम्पियन
154 Views