रोहा ( वार्ताहर) जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा येथिल धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. ॲड. सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींना २८ जानेवारी रोजी दमखाडी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कै. सूर्यकांत वढावकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वर्षे भरामध्ये ज्या कामगार, नातेवाईक ज्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला जनरल मजदूर सभा, ठाणे संघटनेचे संघटक सचिव सुहास खरीवले, खेळू वारगे, एफ डी सी कंपनीचे चंद्रकांत भगत सोल्वे कंपनीचे अध्यक्ष तुषार देशमुख, बेक कमेटीचे अध्यक्ष परशुराम माहबले, कोर्स कमेटीचे अध्यक्ष भगवान करंजे, दिपक नायट्रेड कमेटीचे अध्यक्ष दिलीप सानप,विधीडाय कंपनीचे श्रीकांत जंगम, सुरज माजरेकर अध्यक्ष दिघी पोर्ट कामगार,निलिकाॅन कंपनी अध्यक्ष भरत कोतवाल यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला चंद्रकांत भगत, राकेश बामुगडे, प्रशांत कचरे,अनंत म्हसकर, मनिष साळवी, नितीन रटाटे, नितीन मोरे,मंगेश घरटं, रमेश सानप, नामदेव पवार,विशाल चौऊळकर,अशोक सानप, संजय सावंत,अमित भगत, सर्व कामगार कमेटी मेबंर्स उपस्थित होते.