रोहा (दिपक भगत)१५ जून रोजी धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन (आर. आय. ए) या ठिकाणी भारतीय मजदूर संघा रायगड जिल्ह्याच्या वतीने महिला व युवक मेळावा घेण्यात आला. यावेळी भारतीय मजदूर संघाचे अनेक मान्यवर या मेळाव्यास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रमिक गीताने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पांडयाजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पांडयाजी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास असंख्य महिला आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पांडयाजी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर हात घालत भारतीय मजदूर संघ ही आपली संघटना अधिक बळकट कशी होईल यावर मार्गदर्शन केलं. येत्या जुलै महिन्यात भारतीय मजदूर संघाची ७० वर्ष पूर्ण होणार आहेत ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन केले. अनेक संघटना आल्या, कालांतराने विखुरल्या गेल्या परंतु भारतीय मजदूर संघ ही संघटना मात्र आजतागायात ७० वर्षापर्यंत टिकून राहिली यापुढेही टिकून राहील. या संघटनेचे यशस्वी ७० वर्षे पूर्ण होत आहेत याचे संघटनेचा एक घटक व पदाधिकारी म्हणून मनस्वी आनंद होत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा येऊन गेलो परंतु प्रत्यक्षात रोहा येण्याचं भाग्य आज लाभलं याबद्दल पांडेजी यांनी समाधान व्यक्त केल.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड. अनिल धुमणे म्हणाले की, कामगार हा देखील समाजाचा घटक आहे त्यामुळे त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे भारतीय मजदूर संघाचे कर्तव्यच आहे. याच भावने पोटी आज भारतीय मजदूर संघाचे सहा हजार पाचशे कामगार संघटना असून याचे कोटीहून अधिक सभासद hसंघटनेचे आहेत. या जुलै महिन्यामध्ये भारतीय मजदूर संघाचा ७० व्या वर्षांमध्ये पदार्पण होत आहे यावेळी काही महत्त्वाचे संकल्प करणार असून त्यात प्रामुख्याने २८ ऑगस्ट रोजी पर्यावरणासंबंधी जनजागृती करण्याचा कार्यक्रम, स्वदेशी वस्तू आणि जीवन पद्धतीचा अवलंब ,यावर भर टाकणे,कुटुंब प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेणे, नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, समाजामध्ये सामाजिक समरसता कशी आणता येईल यासाठी विशेष प्रयत्न करणे.
भारतीय मजदूर संघाच्या रायगड जिल्हा आयोजित महिला व युवक मेळाव्यास प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पांडयाजी, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड अनिल ढुमणे, भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश जी, भारतीय मजदूर संघ महामंत्री महाराष्ट्र राज्य किरण मिलगीर, भारतीय मजदूर संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब भुजबळ, रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय मजदूर संघ सुरेश पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाची प्रस्तावना रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाचे कोषाध्यक्ष संदीप मगर यांनी केली. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा सचिव अशोक निकम यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय मजदूर संघाचे रोहा तालुका अध्यक्ष वैभव घाणेकर यांनी केला असून कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पार पाडली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.