रोहा (प्रतिनिधी) १५ जून शनिवार रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा जिल्हा रायगड येथे आनंददायी वातावरणात शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री वाय. डी. पाटील सर तसेच शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री चेंडके सर, माजी मुख्याध्यापक फसाळे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीराम लेंडी, तसेच सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माध्यमिक शिक्षक डी. एम. सकपाळ सर यांनी केले प्रथमतः शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन तसेच खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. रोहा तालुक्यातील आदिवासी समुदायासाठी एकमेव कार्य करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव असून या शाळेमार्फत विद्यार्थ्यांना डीबीटी, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा इत्यादी शासनामार्फत पुरवल्या जातात. सदर शाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असून सुसज्य अशी इमारत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीराम लेंडी यांनी उपस्थित सर्व पालक व विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे सांगितले की सर्व पालकांनी शासनाच्या सुविधांचा लाभ घेणे गरजेचे आहे. व आपल्या पाल्यांना शाळेत शंभर टक्के उपस्थित करणे गरजेचे आहे. शेवटी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक चेंडके यांनी आपल्या मार्गदर्शक पर भाषणात सर्व विद्यार्थ्यांना असे सांगितले की आपण सर्वांनी येत्या शैक्षणिक वर्षात १०० % शाळेत उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. शेवटी शाळेतील शिक्षक जोगळेकर सर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पालक, विद्यार्थी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट केला.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव येथे प्रवेशोत्सव दिन उत्साहात संपन्न
87 Views