उरणच्या भूमीपुत्राने भरला कोकण पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज, पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध – अपक्ष उमेदवार अक्षय म्हात्रे यांची ग्वाही

Share Now

99 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अक्षय महेश म्हात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासनस्तरावर निराकरण करण्यासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात भरला असल्याने त्यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.यावेळी त्यांनी कोकण मतदार संघातील पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे.

अक्षय महेश म्हात्रे (कोकण पदवीधर मतदार संघ अपक्ष उमेदवार) यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मी स्वतः पदवीधर इंजिनिअर आहे, कॉलेज आणि हॉस्टेल चे आयुष्य अनुभवले आहे आणि त्यामुळे मला पदवीधरांच्या समस्यांची जाण आहे.आज कितीतरी सुशिक्षित बेरोजगार आपल्याला समाजात वावरताना दिसतात.किंवा आपली फील्ड सोडून, वेगळेच काहीतरी काम करताना दिसतात.आज अनेक पदवीधर आहेत ज्यांनी गेल्या अनेक टर्म पदवीधर आमदार निवडून दिले.पण असे असूनही त्यांना त्यांचा आमदार कोण आहे हे नक्की सांगता येत नाही.तर आमदारांकडून त्या पदवीधराने नक्की अपेक्षा तरी कशी ठेवावी..?..आणि याचीच खंत बाळगून मी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून मला विश्वास आहे की होऊ घातलेल्या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदार माझ्या सारख्या सर्व सामान्य अपक्ष उमेदवाराला आपला हक्काचा आमदार म्हणून निवडून देतील.असा विश्वास ही व्यक्त केला.

तसेच कोकणात अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहेत, अनेक प्रकल्प येत आहेत त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी, अनेक सरकारी संस्था, शाळा, बँका किंवा कार्यालयात खूप जागा रिक्त होत आहेत त्या जागेवर तातडीने पदवीधरांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच सुशिक्षित बेरोजगार ज्यांचे वय निघून गेले आहे त्यांना किमान ३ ते ५ हजार मासिक वेतन चालू करून देण्यासाठी तत्पर राहणार असल्याची ग्वाही दिली असून अक्षय महेश म्हात्रे या नावा समोर एक (१) हा अंक करून भरघोस मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन अक्षय म्हात्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *