रोहा – प्रतिनिधी :- रोटरी क्लब ऑफ रोहाचा दहावा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी सन २०२४ व २०२५ या सालाकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले किरण ताठरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासह प्रदीप चव्हाण, वरून दिवाण, विदुला परांजपे आदींनी पदभार स्वीकारले. या सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल शीतल शाह व ए. जी. डॉ. दिपक खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गणेश प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष किरण ताठरे यांना संजय नारकर यांनी कॉलर, पीन व चार्टर प्रदान करून अध्यक्षपदाची सूत्रे दिली. तसेच प्रदीप चव्हाण सचिव, वरुण दिवाण खजिनदार आणि विदुला परांजपे यांनी डायरेक्टर पदाचा पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष संजय नारकर यांनी वषर्भरातील केलेल्या कार्याचा आढावा तपशीलवार सांगत त्यांच्या कार्यकाळात मुख्यत्वे रोटरी कॅलेंडर व फॅशन शो या दोन नवीन उपक्रमांची सुरवात करता आली आणि त्यासाठी संपूर्ण रोटरी फॅमिलीची साथ लाभली याचे समाधान मानले. नूतन अध्यक्ष किरण ताठरे यांनी मागील ९ वर्षे सर्व रोटेरिअन्सनी अध्यक्षपदाला न्याय देत विविध समाजपयोगी उपक्रम राबवले हे सांगत, आगामी वर्षातील अनेक सामाजिक उपक्रम हाती घेणार असुन प्रामुख्याने आरोग्याशी निगडित उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी २ नवीन सदस्यांना सदस्यत्व देण्यात आले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शाह यांनी संजय नारकर यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमाचे कौतुक करत रोटरी क्लब ऑफ रोहाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वर्षभरात रोटरी क्लब तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. ए.जी. डॉ. दिपक खोत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या अध्यक्षा मनीषा नगरकर, संतोष नगरकर, क्लबचे अन्य मेंबर्स तसेच रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवऊर्जा समूहाचे सचिन व समीर दळवी, लायन्स क्लबचे अब्बास रोहवाला आदी मान्यवरांचसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील धनावडे यांनी केले तर रोटरी वर्ष २०२५-२६ चे प्रेसिडेंट नॉमिनी राजेंद्र पोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रोटरी क्लब ऑफ रोहाचा पदग्रहण सोहळा ; किरण ताठरे यांची अध्यक्षपदी निवड
101 Views