नागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे परिसरात वाढणाऱ्या अवैध जुगाराच्या पार्श्वभूमीवर व वजरोली येथील ग्रामस्थांच्या नागोठणे पोलिस ठाण्यात वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत नागोठणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक रिक्षा, एक मोटारसायकल व रोकड मिळून एकूण ४ लाख, ३४ हजार २४० रूपये किंमतीचा मुद्देमाल नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुगार खेळणाऱ्या सात जणांविरोधात नागोठणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागोठणे पोलिस ठाणे माहितीनुसार वजरोली गावात जुगार खेळ चालत असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळताच यातील सात जण रिक्षा व मोटारसायकलचा उपयोग करुन दिनांक २८ जुलै रोजी वजरोली येथील शांताराम गोपाल खेडेकर यांच्या घराच्या मागील बाजूस वाहने उभी करुन जुगार खेळण्यासाठी खेडेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत गेले होते. त्यानंतर नागोठणे पोलिसांनी त्या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नागोठण्याजवळील वजरोली (ता.रोहा) येथील शांताराम खेडेकर यांचे राहत्या घराचे पाठीमागील मोकळया पडवीत छापा टाकला. नंतर त्याठिकाणी जुगार खेळत असलेल्या सात जणांना नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
याबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०४/२०२३ अन्वये जुगार अधिनियम, १८६७ चे कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नागोठण्याचे सपोनि संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह महेश लांगी हे अधिक तपास करीत आहेत.