उरण ( विठ्ठल ममताबादे ) समाजातील वाढते अपघातांचे प्रमाण, वाढते विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये तसेच रक्ता अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या अनुषंगाने न्हावा शेवा सी .एच.ए आधार सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत श्री दत्त मंदिर, पाणदिवे, उरण येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत देशातील थॅलेसेमिया व अपघातग्रस्त रुग्णांची रक्ताची गरज लक्षात घेउन आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात इच्छुक रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन मोठया प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रुपेश भगत फोन नंबर -96193 95292, श्याम गावंड – 9664034347, हनुमान म्हात्रे- 9867886480 यांच्याशी संपर्क साधावे.
न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन
98 Views