उरण ( विठ्ठल ममताबादे ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )पक्षाची रायगड जिल्ह्यात मोठया प्रमाणात मोर्चे बांधणी सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नियुक्ती विविध पदावर करण्यात येत आहे.माजी जिल्हा परिषद सदस्या कुंदा वैजनाथ ठाकूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंढे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असणारी संघटना उरणमध्ये बांधण्याची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कुंदा ठाकूर या जासई गटाच्या जिल्हा परिषद म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. जि.प. सदस्य असताना त्यांनी दिघोडे आरोग्य केंद्र, दिघोडे सबस्टेशन आदी विकासकामे केली होती. त्यांचे पती वैजनाथ ठाकूर हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.जुन्या व निष्ठावंत, प्रामाणिक पदाधिकारी असलेल्या कुंदा वैजनाथ ठाकूर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी उरण शहर अध्यक्ष सायमा शेख यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावरही शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदी कुंदा ठाकूर
96 Views