रोहा : वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने केले परखड मतप्रदर्शन, डॉ सी डी देशमुखांच्या जयंती दिनी आयोजन

Share Now

185 Views

रोहा (प्रतिनिधी ) संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोह्याचे सुपूत्र स्व डॉ चिंतामणराव देशमुख यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या सहभागातून रोहा प्रेस क्लब आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरील परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ सी डी देशमुख यांच्या अजरामर कार्याची उजळणी केली. यावेळी युवा शक्तीकडून होणारे विचारमंथन ऐकण्यासाठी रोहेकरांनी ऐतिहासिक राममारुती चौकात गर्दी केली होती.

रोहा तालुक्यातील सुराज्य प्रतिष्ठान, अभिनव रोहा, शिवचरण मित्रमंडळ, स्पंदन नाट्य संस्था, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फौंडेशन, श्रीकृपा फाउंडेशन, रोटरी क्लब, रोट्रैक क्लब, रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहयोगातुंन रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत खुल्या गटात श्रवण कदम प्रथम, भरत चौधरी द्वितीय, केतन गुप्ता तृतीय, निकिता बोथरे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. लहान गटात साहिल शिवाजी मोटे, प्रथम, तेजस मगुतकर द्वितीय, आर्या हिराजी शेळके तृतीय आणि आदिती वाटवे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. अल्पावधित आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रा एस डी पाटील, टी पी मोकल, रविंद्र कान्हेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ पत्रकार दिलिप वडके, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब, ज्येष्ठ वत्सराज सर, ज्येष्ठ पत्रकार अरुण करंबे, पांडुरंग सरफळे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वक्तृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करून युवकांच्या संवेदनांना वैचारिक दिशा देण्याचे काम केले असून यामुळे युवकांना व्यक्त होण्यासाठी सध्याच्या समाजमाध्यमांच्या पेक्षाही अधिक परिणामकारक माध्यम उपलब्ध झाले आहे, अशा वक्तृत्व स्पर्धांतून व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते, त्यासाठी अशा स्पर्धा भरविल्या गेल्या पाहिजेत, ते कृतीशील काम रोहा प्रेस क्लब, युथ फोरमच्या व अनेक सहयोगी संस्थां करीत आहेत असे स्पर्धा समिती प्रमुख राजेंद्र जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकात स्पष्ट केले. यावेळी सुराज्य संस्थेचे रोषण चाफेकर, अभिनवचे हर्षद साळवी या युवा वक्त्यांनी विचार मांडले. स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरील परखड मतप्रदर्शन केले. निनाद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदरशनाखाली रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, उपाध्यक्ष नंदकुमार मरवडे, उद्धव आव्हाड, सरचिटणिस रविंद्र कान्हेकर, खजिनदार संदीप सरफळे, अंजुम शेटे, विश्वजीत लुमण, शरद जाधव, पराग फुकणे, केशव म्हस्के, सागर जैन, दिनेश जाधव, प्रशांत देशमुख, सिद्देश ममाले, समिधा अष्टीवकर, नंदकुमार बामुगडे, जितेंद्र जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *