महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटनेची शासन मान्यता प्राप्त नविन कार्यकारणी, व्यवस्थापन समिती जाहिर

Share Now

112 Views

उरण (विठ्ठल ममताबादे) राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा व मेळावा खोपोली-रायगड येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश पोसतांडेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर सभेत संघटनेच्या उपविधी नियम ९ व १० नुसार संघटनेच्या कार्यकारणी/ व्यवस्थापन समितीवर नवीन पदाधिकाऱ्यांची दिनांक ११/०६/२०२४ च्या कार्यकारणी सभेत निवड करण्यात आली होती. सुरेश पोसतांडेल -प्रदेशाध्यक्ष, रामेश्वर वाघमारे – प्रदेश कार्याध्यक्ष, गिरीश डुबेवार-प्रदेश उपाध्यक्ष, अनिल पवार -प्रदेश सरचिटणीस, लालू सोनकांबळे- प्रदेश कोषाध्यक्ष, विजय भोंडवे- प्रदेश संघटक यांच्या निवडीस एकमताने मान्यता देण्यात आली. तसेच या सभेत असे मंजूर करण्यात आले की, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मा.शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी चार टप्प्यात आंदोलन करून जर मागण्यां मान्य न झाल्यास येणा-या विधान सभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

सदर सभेस सुरेश पोसतांडेल -प्रदेशाध्यक्ष,के.के.आंधळे- संस्थापक अध्यक्ष- प्रमुख, गिरीश डुबेवार-प्रदेश उपाध्यक्ष, अनिल पवार -प्रदेश सरचिटणीस, लालू सोनकांबळे- प्रदेश कोषाध्यक्ष, विजय भोंडवे- प्रदेश संघटक, विश्वनाथ घुगे – संघटना प्रमुख, धर्मा खिल्लारे- प्रमुख मार्गदर्शक, मारोती गायकवाड- राज्य समन्वयक, देवराम मुके, सदाशिव कवडे-कार्यालय प्रमुख, प्रशांत रहागडले – सह. सरचिटणीस झुंबर माने- कायदेशीर सल्लागार, सल्लागार समिती- सदाशिव कवडे, रमेश वाळकीकर, ञिंबक देशमुख, गजानन इंगळे, सुभाष मोरे, सोनुने तसेच महीला संघटक- रंजना दुर्गाडे, हिमाली कुलकर्णी, अश्विनी धोंडगे, शैलेजा फुलारे, विभागीय अध्यक्ष-नासीर अली सय्यद (नागपूर), बलभीम शेंडगे (मराठवाडा), मंगेश पाटील (कोकण), किरण आहेर (नाशिक) जिल्हा अध्यक्ष-राजेश शिंदे (रायगड), जालींदर पवार (नाशिक) सुभाष साळुंखे(ठाणे) मार्तंड वनजे(नांदेड), मंगेश पेडामकर (रत्नागिरी), देवा देवकुळे, संतोष देशमुख, सुनिल जाधव तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *