रोहा (वार्ताहर): रुग्णांसाठी नेहमीच आधारवड ठरत त्यांना आजारातून बरे करून पुन्हा आनंदी जिवन जगण्याची प्रेरणा देणारे रोह्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक जाधव यांना देशातील वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित व प्रेरणादायी डॉक्टर्स म्हणून सन्मानीत करण्यात आले.
शनिवार दि. २९ जुन रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या पूर्वसंध्येला टाइम्स नाऊ मीडिया ग्रुप तर्फे दिल्ली येथील ताज पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या शुभहस्ते डॉक्टर अशोक जाधव यांना लिजेंड ऑफ म डीसिन (Legend of medicine) पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
रोहा तालुक्यात कोरोना काळात डॉ. अशोक जाधव यांनी रात्री अपरात्री कधीहीं नागरिकांची गैरसोय होऊन दिली नाही. ते रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असत. डॉ. जाधव यांच्या नर्सिंग होममध्ये श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, मुरुड, मोर्बा, महाड, पाली, सुधागड, कोलाड, नागोठणे, रेवदंडा येथुन राज्ञी अपराजी रुग्ण उपचारासाठी येत असतात. डॉ. जाधव यांचे सुयोग्य ट्रीटमेंट व सकारात्मकतेची जोड यामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. त्याम ळे ते अनेक रुग्णांसाठी देवदूत’ ठरले. डॉ. अशोक जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक, कला, क्रीडा, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.